भाळवणी -पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख ,पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य व पंचायत समिती सदस्य संभाजी शिंदे, भाळवणी यांनी गोरगरीब, निराधार, आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सफाई कामगार महिला यांच्या २०० कुटुंबातील व्यक्तींना ५ किलो गहू ,२ किलो तांदूळ,२५०ग्राम तिखट, ५००ग्राम मीठ,कपड्यांचा साबण १,हात धुन्या करिता १ साबण पंढरपूर प्रांताधिकारी सचिन ढोले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, शिवसेना सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा.शिवाजी सावंत, शिवसेना सांगोला तालुका प्रमुख सुर्यकांत घाडगे,शिवसेना पंढरपूर शहर प्रमुख रवि मुळे, इ बा मुलाणी,सरपंच जयश्री शिंदे, दिपक गवळी, दाऊद शेख,आंनद देशपांडे आदिंच्या उपस्थितीत वाटप केले .


यावेळी प्रांत अधिकारी सचिन ढोले म्हणाले, देशात कोरोनामुळे सर्वसामान्य माणसाला जीवन जगत येणे शक्य होत नाही. तेव्हा आपल्या गावात एक हात मदतीचा हि अतिशय सुंदर कल्पना शिंदे यांनी सुरू केली आहे. त्याबद्दल धन्यवाद.


यावेळी संभाजी शिंदे म्हणाले,शिवसेना व सामाजिक बांधिलकी म्हणून मी १८ क्विंटल अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले आहे.
 
Top