नवी दिल्ली, १६ एप्रिल २०२० - लॉकडाऊनच्या काळात, विद्यार्थ्यांना घरच्या घरी अभ्यासात मदत मिळावी, यासाठी, देशातील सार्वजनिक प्रसारण सेवेने पुढाकार घेतला आहे. विविध सरकारी संस्थांशी समन्वय साधून दूरदर्शन आणि आकाशवाणी आभासी दूरस्थ वर्ग(व्हर्च्युअल क्लासेस) आणि इतर शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रसारण करत आहे. देशभरातील प्रादेशिक वाहिन्यांवर, टीव्ही, रेडीओ आणि युट्यूब वर हे कार्यक्रम मुलांना बघता येतील.

सध्या शाळा-महाविद्यालये बंद असल्याने, या व्हर्च्युअल क्लासेसचा लाभ, लाखो विध्यार्थाना होत आहे. विशेषतः दहावी आणि बारावी इयत्तेच्या मुलांना बोर्डाची तयारी तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी यातून मार्गदर्शन केले जात आहे. 


   दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या या व्हर्च्युअल क्लासेसमध्ये अभ्यासक्रमावर आधारित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असे वर्ग करण्यात आले आहेत. काही राज्यांत  एसएससीचे विषय आणि नमुना प्रश्नपत्रिका सुद्धा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.यापैकी अनेक क्लासेस मध्ये विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांची तयारी करुन दिली जात आहे.

   अभ्यास अधिक रोचक करण्यासाठी,अभ्यास क्रमाव्यतिरिक्त सामान्य ज्ञान आणि नामवंत व्यक्तींच्या प्रेरणादायक कथाही सांगितल्या जात आहेत.

    सध्या घरातच असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि वेळापत्रक कायम रहावे, या हेतूने बहुतांश क्लासेस सकाळी लवकर ठेवण्यात आले आहेत.
दूरदर्शन :
कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, गुजरात, जम्मू आणि काश्मीर या राज्यांतल्या दूरदर्शन केंद्रात आधीच असे व्हर्च्युअल क्लासेस सुरु झाले आहेत.
आकाशवाणी :
आकाशवाणीच्या,महाराष्ट्रातील जळगाव, सांगली, रत्नागिरी, परभणी, औरंगाबाद, पुणे, नागपूर, मुंबई तसेच गोव्यातील पणजी या शहरांतील केंद्रासह,देशभरातील २४ केंद्रातून हे कार्यक्रम प्रसारित केले जात आहेत.  

 दूरदर्शनचे एक केंद्र प्रतिदिन सरासरी २.५ तास शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रसारण करीत आहे तर आकाशवाणीच्या एका केंद्रावरून प्रतिदिन सरासरी अर्धा तास असे कार्यक्रम प्रसारित केले जात आहेत.

या शैक्षणिक कार्यक्रमांची आणि केंद्रांची संपूर्ण यादीसाठी येथे क्लिक करा.
‍U.Ujgare/R.Aghor/P.Kor
 
Top