पंढरपूर शहरातील नागरिकांनी उस्फूर्त ३ दिवस १०० टक्के लॉक डाऊन केले त्याबद्दल नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले यांनी शहरवासीयांचे मानले आभार व उद्या गर्दी न करण्याचे आवाहन
पंढरपूर नगरपरिषद चे वतीने शहरातील नागरिकांनी २२ एप्रिल ते२४ एप्रिल असे ३ दिवस १०० टक्के लॉकडाऊन करणेबाबत आवाहन केले होते. त्यानुसार सर्व पंढरपूरकरांनी नगराध्यक्षा व नगरसेवक यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तीन दिवस १०० टक्के शहर बंद ठेवले त्यामुळे नगराध्यक्ष सौ साधनाताई नागेश भोसले यांनी शहरवासीयांचे आभार मानले व उद्या अक्षयतृतीया असल्याने लॉकडाऊन उठल्यानंतर गर्दी होऊ नये म्हणून आंबे विक्रीसाठी सखुबाई कन्या प्रशाला पटांगण ,महावीरनगर पटांगण व रुळाच्या वरच्या भागासाठी रेल्वे ग्राऊंड येथेच आंबा विक्री होईल. तसेच कुंभार समाजासाठी कळस व केळी विक्री साठी टिळक स्मारक पटांगण व जुन्या एस टी स्टँड समोरील पटांगण येथे जागा निश्चित केली आहे.

ज्यांना भाजीपाला दूध विक्रीचे पास दिले आहेत त्यांनी ज्या ठिकाणीचे पास दिले आहेत त्याच भागात भाजीपाला विक्री करण्याची आहे कोणीही गर्दी करू नये असे आवाहन नगराध्यक्ष सौ साधनाताई भोसले यांनी केले आहे.


तसेच उद्या बाजारात गर्दी होऊ नये म्हणून मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांचे मार्गदर्शना खाली उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर व नगररचनाकार अतुल केंद्र यांनी गर्दीवर नियोजन व नियंत्रण ठेवण्यासाठी १७ जणांची टीम तयार केली असून प्रत्येक चौकात ही टीम कार्यरत राहणार आहे व कोठेही गर्दी होणार नाही याची दक्षता घेणार आहे .उद्या सकाळी ०७ ते दुपारी ०२ पर्यंत पूर्वीप्रमाणे अत्यावश्यक सेवा कार्यरत राहतील.०२ नंतर सर्व अत्यावश्यक सेवा बंद करण्यात याव्यात तसेच सोशल डिस्टन्स व सॅनिटायझर व मास्क चा वापर करावा अन्यथा त्यांचेवर दंडात्मक व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सांगितले
 
Top