नातेपुते,(श्रीकांत बाविस्कर) -कोरोना व्हायरसच्या संसर्गाने संपूर्ण भारतात थैमान घातले आहे यामुळे सगळीकडे लाॅकडाऊन केले आहे. लाॅकडाऊन झालेपासूनच डाॅ.धवलसिंह मोहीते पाटील यांनी लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहीते पाटील यांनी घालुन दिलेल्या आदर्शाप्रमाणे जनसेवेसाठी सक्रीय सहभाग घेतला. कोरोना व्हायरस संसर्गामुळे लाॅकडाऊन झालेपासुन रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. एक हजार बाटल्या रक्तदानाचा संकल्प केला होता .आतापर्यंत जवळजवळ ९०० बाटल्या रक्तदान झाले असुन ब्लडबॅकेचे गरजे प्रमाणे रक्तदान केले जात असून त्यांनी स्वतः ही रक्तदान केले आहे. 

     अन्नाचे मोठ्या प्रमाणात हाल होते यासाठी डाॅ.धवलसिंह मोहीते पाटील यांनी सोलापुर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जनसेवा संघटनेचे कार्यकर्त्यांना अन्नदान करणेसाठी आव्हान केले. त्यानुसार सोलापुर, पुणे,सांगली,उस्मानाबाद, सातारा,अ.नगर , लातूर याठिकणी कार्यकर्ते अन्नदान जीवनावश्यक वस्तुचे किट वाटप करित आहेत.अकलुजसह माळशिरस तालुक्यात सुमारे ५००० पेक्षा जास्त लोकांना जीवनावश्यक सामान, भाजीपाला,सॅनेटायजर,मास्क वाटप केले आहेत. 

     डाॅ.धवलसिंह प्रतापसिंह मोहीते पाटील हे शेतकर्यांसाठी बोअरवेल्सचा प्रश्न असो कि जनतेचा रेशनचा प्रश्न किंवा पत्रकारांना मदतीचा प्रश्न शासन दरबारी प्रामाणिकपणे मांडण्याचा, त्यांना न्याय मिळवुन देण्याचे काम करीत आहेत. सहकार महर्षि शंकरराव मोहीते पाटील व लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहीते पाटील यांनी घालून दिलेल्या "जनसेवा हिच ईश्वर सेवा" या ब्रिद वाक्यास अनुसरून ते या कोरोना संसर्गामुळे देशावर आलेल्या संकटाचे काळात सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम करित आहेत.
 
Top