पंढरपूर(प्रतिनिधी):- जो कोरोना सजीव का निर्जीव यात मतैक्यता नसलेल्या थोतांड विज्ञानाच्या कपोलकल्पिक कोरोनाच्या धास्तीने संपुर्ण जग लाॅकडाऊन झाले.यात गरिब-श्रीमंतां पेक्षा मध्यमवर्गीयांना याचा फटका जास्त बसत असून, शेतीमाल शेतात पडून, विशिष्ट व्यापारी यंत्रणा शेतीमालाची साठेबाजी करीत आहेत. शेतकर्यांनी लाखो रुपये मातीत घालून भुमातेच्या कृपेने सोन्यासारखा नाशवंत माल पिकविला आहे. मात्र लाॅकडाऊनमुळे या मालाला बाजारपेठ उपलब्ध नाही. त्यामुळे संकटाच्या गर्तेतील शेतकरी अधिकच संकटाच्या गर्तेत अडकत आहे, याचा गैरफायदा मध्यस्थ दलाल घेत आहेत, अशा परिस्थिती ग्रामस्वराज्याच्या धर्तीवर शेतकर्यांनी चलन विनीमयाऐवजी वस्तूविनीमय केल्यास लाॅकडाऊनच्या काळातही आपली अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्याचे अहोभाग्य शेतकरी वर्गाला लाभू शकेल, असे प्रतिपादन व आवाहन राधेश बादले पाटील यांनी केले.

     लाॅकडाऊनमध्ये बाजारपेठा उपलब्ध नसल्याने कलिंगड, खरबूज, द्राक्षे,भाजीपाला उत्पादक शेतकर्यांचे अतोनात नुकसान होत आहे. *बळीराजा हाच जगाचा पोशिंदा* असुनही कोलमडून पडत आहे. अशावेळी शेतकरी वर्गाला मदतीचा हात देणारा कोणीही पुढे येताना दिसून येत नाही.नाशवंत फळांपासून काही उपपदार्थ निर्मिती करता येईल का? अथवा स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करुन देतां येईल का? याबाबतही कोणी चाचपणी घेताना वा प्रत्यक्ष कारवाई करताना दिसून येत नाही.

     अशावेळी आशेच्या किरणांची शेतकर्यांनी वाट न पाहता वस्तूविनीमयावर भर देणे आवश्यक असून, ग्रामस्वराज्याला प्राधान्य देणे काळाची गरज आहे. कारण जग जरी खेडं झाले असले तरी खेड्यातच जग आहे, हे आरोग्याच्या दृष्टीने विसरुन चालणार नाही. लाॅकडाऊन काळात भोजनाऐवजी फलाहाराला प्राधान्य दिले तर परिस्थिती निश्चितच बिकट होणार नाही.कारण शेतकरी वाचला तरच जग वाचेल, हे त्रिकाल बाधित सत्य आहे. आपण सर्वच बाबी सरकारवर सोपविल्यास प्रशासकीय राजवटच सत्ता हस्तगत करते, यासाठी सर्वसामान्यांनी दक्ष राहणे आवश्यक असते. सर्वच बाबतीत सर्व अपेक्षा राजकीय लोकांकडून ठेवून स्वत:ला विकलांग बनविण्यापेक्षा वस्तूविनीमयाचा पर्याय सरस व स्वयंभू ग्रामसमाजहितास्तव आवश्यक आहे. यामुळे समाजातील दरी, व्यापारातील दरी नष्ट होऊन, दलाल- मध्यस्थांची गरज उरणार नाही. म्हणून शेतकरी ते ग्राहक हि संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी शेतकरी व ग्राहक या दोहोंनी पुढाकार घेण्याचा हा काळ आहे.

        शेतकर्यांनी वस्तूविनीमयाची बाजारपेठ तयार केल्यास लाॅकडाऊन मध्ये जग आर्थिक मंदीत असतानाही, भारतात मंदीचे वारेही फिरकणार नाही, हे निश्चित!
   *जगाचा पोशिंदा बळीराजा सुखी भव!*

 संपादक राधेश बादले पाटील, पंढरपूर
साप्ताहिक राष्ट्रसंत
 
Top