पंढरपूर - कोरोना मुळे देशामध्ये खुप समस्या निर्माण झाल्या आहेत. नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन करण्यात येत आहे. डॉक्टर देवदुता प्रमाणे काम करत आहे.नगरपरिषदेच्या दवाखान्यात पिपीई किट कमी असल्याचे समजता लायन्स क्लब पंढरपूरकडून १५ पिपीई किट उपलब्ध करून देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुजाता गुंडेवार,सदस्य डॉ.प्रवीणा लवटे, ललिता कोळवले,डॉ.दिपाली रेपाळ, सौ वैशाली होटे , डॉ.विवेक गुंडेवार, अँड.भारत वाघुले व आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांनी १५ पिपीई किट उपलब्ध करून दिले.
पंढरपूरमध्ये लॉकडाउनमुळे बरेचसे लोक अडकून पडले आहेत. प्रशासनाचेवतीने अशा लोकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. समाजातील दानशूर लोकांना व सामाजिक संस्थेने याप्रसंगी गरजुंपर्यंत मदत पोहचवण्यासाठी प्रांत अधिकारी सचीन ढोले , मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,तहसिलदार डॉ.वैशाली वाघमारे यांच्यावतीने मदतीसाठी आवाहन करण्यात येत आहे.
प्रांत अधिकारी सचीन ढोले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लायन्स संस्थेने केंद्रे महाराज मठ येथे परप्रांतातील अडकलेल्या नागरिकांसाठी शिधा देण्यात आला.
लायन्स संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे ज्यांना शक्य आहे अशा व्यक्तिंनी गरजु व्यक्तीना ज्यांचे हातावरील पोट आहे अशा गरजुंपर्यंत मदत पोहोचवावी.
याप्रसंगी प्रांत अधिकारी व त्यांच्या प्रतिनिधीनी लायन्स संस्थेचे आभार मानले. मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी संस्थेचे आभार मानताना या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी सर्व गरजू पर्यंत आवश्यक ते पोहचेल असे सांगितले.
लायन्स संस्थेच्यावतीने , शासनाचे आदेश पाळा व डॉक्टर,पोलीस,आरोग्य विभागातील कर्मचारी, शासनाच्या प्रतिनिधींना सहकार्य करा असे आवाहन करण्यात आले.संस्थेच्या सेक्रेटरी ललिता कोळवले-जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. अध्यक्षा डॉ.सुजाता गुंडेवार ,डॉ.सुधीर आसबे, सुदीप शहा,रा.पा.कटेकर,
डॉ.पल्लवी माने, डॉ.अजित गुंडेवार,डॉ.मनोज भायगुडे, राजेन्द्र शिंदे, डी.एन.पैलवान,राजेन्द्र गुप्ता, आरती बसवंती , मंजिरी दाते , शकिलभाई सौदागर , डॉ. स्मिता मेणकूदळे,डॉ.मृणाल गांधी, डॉ.प्रियांका जरे,डॉ.रेखा मोहिते,डॉ संध्या गावडे , इमरान मुल्ला, मुन्नागिर गोसावी,गुलताज भायाणी, विशालाक्षी पावले,सुरेखा कुलकर्णी,तृप्ती गानमोटे, सरिता गुप्ता, लता गुंडेवार, स्नेहा गोसावी, गिरिष पाटील,उर्मिला गुंडेवार, रूपा वोहरा,स्मिता अधटराव, अर्चना ताठे देशमुख,सरोज लाड , माधुरी जाधव,कौस्तुभ देशपांडे,बाळासाहेब रणदिवे या सर्व सदस्यांनी संस्थेचा निधी न वापरता स्वतःचे अन्नधान्य देऊन मदत केली.