नातेपुते,(श्रीकांत बाविस्कर)-रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी करमाळा तालुक्यातील खासगी सेवा देणार्‍या डाॅक्टरांबरोबर विडीओ काँन्फरंसिंग द्वारे संवाद साधून खासगी डाॅक्टरांना सध्या काम करत असताना येनार्या अडचणी समजुन घेतल्या. या वेळी सहभागी डाॅक्टरांनी पीपीई किट व N95 मास्क उपलब्ध करुन देण्याविषयी मागणी केली. तसेच खासगी डाॅक्टरांकडे उपचाराला येण्यापुर्वी संबधित व्यक्ती कोरोना हाॅटस्पाॅटमधून स्थलांतरीत झालेली नसल्याचे तलाठी, ग्रामसेवक अथवा पोलिस पाटील यांचा दाखला घेवुनच उपचाराला येण्याची तरतुद करण्यात यावी या विषयी तहसिलदार यांना बोलण्यात यावे अशी मागणी केली. त्याच प्रमाणे प्रत्येक गावात बाहेरुन स्थलांतरीत झालेल्या व्यक्तीची लिस्ट त्या त्या भागातील खासगी डाॅक्टरांकडे देण्यात याव्यात जेणेकरुन संबधित व्यक्तींवर उपचार करताना डाॅक्टरांना सुरक्षेच्या दृष्टीने अधिक काळजी घेता येईल.आज सॅनिटाईझर सहज उपलब्ध होत असताना सुरक्षेच्या दृष्टीने ईतर वैद्यकिय साधनां साठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात यावा अशी मेडीकोज गिल्ड या खासगी डाॅक्टरांच्या वतीने रणजीतसिंह मोहिते पाटील यांना विनंती करण्यात आली.

     यावर मोहिते पाटील यांनी चोदाव्या वित्त आयोगातुन प्रत्येक ग्रामपंचायतीच्या अखत्यारी तील खासगी डाॅक्टरांना सुरक्षा किट उपलब्ध करुन देण्याविषयी तालुका पंचायत समितीच्या बीडीओंशी चर्चा करुन मार्ग काढण्याचे आश्वासन यावेळी दिले.

    सुरक्षेच्या दृष्टीने सर्दी,खोकला,थंडी,ताप,यांवर उपचार करण्यासाठी ठराविक वेळेकरिता एक विलगीकरण वार्ड तालुक्याच्या ठिकाणी तयार करण्यात येवून सर्व खाजगी डाॅक्टरांना त्या ठिकाणी येवुन उपचार देता येतील का आणि तशा प्रकारची सोय तालुक्याच्या ठिकाणी करता येईल का या विषयी तहसिलदार, करमाळा यांच्याशी बोलण्यात येईल असेही मोहिते पाटील यांनी सांगितले.

      यावेळी करमाळा मेडीकोज गिल्ड या खासगी डाॅक्टरांच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.जिनेद्र दोभाडा,कार्यकारी अध्यक्ष डाॅ.अंकुश तळेकर, डाॅ.अमोल घाडगे,उपाध्यक्ष प्रसाद भुजबळ,महिला विंगच्या अध्यक्षा डाॅ.कविता कांबळे,संघटनेचे सचिव डाॅ अमोल दुरंदे,डाॅ पल्लीवी पवार यांच्या सह विडीओ काँन्फरंसिंगमधे करमाळा तालुक्या तील ३७ डाॅक्टरांनी सहभाग घेतला होता.
 
Top