साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर,ता.बारामती,जि. पुणे या साहित्य संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे राज्यस्तरीय खुली कविता लेखन स्पर्धा - २०२० चे आयोजन केले आहे.

   महाराष्ट्रातील प्रतिभावंत कवी /नवोदित कवी/ कवयित्री व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना विविध विषयांवरील (कवितांना विषयाचे बंधन नाही) स्वरचित कविता पाठविण्याचे आवाहन साहित्य प्रेमी मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.

  उत्कृष्ट कवितेसाठी खालील बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. 
* प्रथम क्रमांक - (२०,०००/- रुपये रोख, स्मृतिचिन्ह ,मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ)
 * द्वितीय क्रमांक - ( १५,०००/- रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ)
* तृतीय क्रमांक - (१०,०००/- रुपये रोख, स्मृतिचिन्ह,मानपत्र, शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ )
*चतुर्थ क्रमांक - ( ५,०००/- रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ )
* पाचवा क्रमांक - (३,०००/- रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ ) 
तसेच निवडक १५० कवितांचा समावेश " काव्यसुगंध " या राज्यस्तरीय प्रातिनिधिक कविता संग्रहात करण्यात येणार आहे.

   त्यासाठी आपल्या स्वरचित १ किंवा २ कविता (टाईप केलेल्या) आपला संपूर्ण पत्ता,भ्रमणध्वनी, आयकार्ड साईज फोटोसह (९६६५००९७४०)(w.p) व्हाट्सअप नंबरवर दि- १५ ऑगस्ट २०२० पर्यंत पाठवावी.

   * टीप - स्पर्धेसाठी स्वरचित कविता १ किंवा २ ( १६ ते २० ) ओळींची असावी. 
असे आवाहन प्रा. हनुमंत विठ्ठलराव माने (साहित्यस्नेही) ,संस्थापक अध्यक्ष- साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर ता- बारामती जि- पुणे पिन कोड - ४१२३०६ भ्रमण- ९६६५००९७४०(w.p)  व  ८३२९२५२९६२ या मोबाईल नंबरवर स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी संपर्क करावा.
 
Top