पंढरपूर - कोरोना विषाणू रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना अनुषंगाने पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील खते, बी-बियाणे विक्रेते, शेती उपयोगी अवजारे विक्रेते, ट्रॅक्टर शोरूम धारक यांची आज दिनांक ०५/०४/२०२० रोजी सकाळी ११.०० ते ११.४० चे दरम्यान पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे मीटिंग घेण्यात आली.

मीटिंगकरिता उपस्थित दुकानदार यांना पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले.

सदर मिटिंग करिता पंढरपूर शहरातील शेती उपयोगी मालाची विक्री करणारे ४५ दुकानदार उपस्थित होते.
 
Top