पंढरपूर : पंढरपूर मुद्रक संघ पंढरपूरच्या वतीने सर्व मुद्रकांना जीवनाश्यक वस्तुचे वाटप आमदार प्रशांत परिचारक यांचे हस्ते व संस्थापक अध्यक्ष गजाननराव बीडकर यांचे उपस्थितीत करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या वेळी बोलताना आमदार प्रशांत परिचारक यांनी मुद्रकांच्या अडचणी जाणून घेतल्या व जीवनावश्यक वस्तु देऊन मुद्रकांना चांगला आधार दिला. अशावेळेस एकमेकांस सहकार्य व आपुलकीची भावना व एकी ठेवली तर तुम्हाला कधीच अडचण येणार नाही असे सांगितले.


 यावेळी गजानन बीडकर म्हणाले की,मुद्रकांना व्यवसाय बंद असल्यामुळे आर्थिक अडचणी येत आहेत ही जाणीव ठेऊनच संघाच्या वतीने मदत करण्यात आली. 

   कोरोना प्रादुर्भावामुळे पंढरपूर शहरातील सर्व मुद्रकांचे प्रिंटिंग प्रेस बंद आहेत. त्यामुळे मुद्रकांची आर्थिक ओढाताण चालू होती. ही अडचण लक्षात घेऊन मुद्रक संघाच्या शिल्लक रकमेतून सर्व मुद्रक बांधवाना जीवनावश्यक वस्तु देऊन आप्तकालीन परिस्थितीत आधार देण्याचे ठरवले. लॉकडाऊन संपल्यानंतरही लग्नसराई व इतर कामे कमी होणार आहेत. 

   सर्व मुद्रकांना सोशल डीस्टन्स ठेऊन आरोग्याची खबरदारी घेऊन प्रत्येकाला गहू,तांदुळ,साखर, शेंगदाणे,तीन प्रकारच्या दाळी, कपडे,अंगाचा साबण,भांड्याचे साबण,गोडेतेल इ.जीवनाश्यक वस्तु देण्यात आल्या.

   या कार्यक्रमासाठी मुद्रक संघाचे अध्यक्ष दत्ता पाटील, मकरंद वैद्य, श्रीराम रसाळ, रामकृष्ण बीडकर , प्रदीप भोरकर,श्रीनाथ साळुंखे आदींसह सर्व मुद्रकांनी सहकार्य केले.
 
Top