आ बे पऱ्या ऐकताव का नाही? "
कोरोना बोकांडी बसायला लागलय बे ,
आता काय बी खरं नव्हं ?

आ बे बा ला इचार गाठोडं कुठं ठेवलाव ?
पऱ्या उसळी मारत उत्तरला "तम्या चार पोरं झाली पण बे अजून सुधारलाव नाय " ऊग गप्प बस्स कालवा करू नगस "

तम्मा पुढं म्हणाला , "अरं एक सुदीक पुढारी फिरकना , बोल ना संबंधी थंड पडल्यात  बे अगदी शिळा पडत्यात तसं "

आ बे त्यांची काळजी तू का करतोस "त्यानं लय खंबीर हायत बे "

पऱ्यान जाता जाता टोला हाणला !ते जाऊ दे रे आपलं सोलापूर सुधारणार कवा बे , संचारबंदी हाय तरी जाईल तिथे गर्दी करायला लागलेत "कोण तरी म्हणलं का बे सोलापूरला संचारबंदी हाय ?


कोण बी राहू देत , कसलं बी फर्मान निघू  देत काय बी परिणाम होतं नाय " सोलपुरी लय भारी बे मनाला पटलाव तरच होकार नाय ते जा बोंबलत "तम्मा उठताना म्हणलं "आ बे सोलापूर लय भारी हाय कवा काय करतील सांगता येत नाही , सोलापूर ते सोलापूर बे "!!


गावठी चिमटा :

कुराण वाचा अथवा पुराण 
सर्वच शांतीचा संदेश देतात
पण माणसं फक्त पेटवण्यासाठीच 
धर्मच का वापरतात समजत नाही 
सत्तेसाठी मताचे राजकारण हे मात्र खोटं नाही "!!

आनंद कोठडीया , जेऊर ता.करमाळा 
९४०४६९२२००


 
Top