पंढरपूर -करोनाच्या रुग्ण संख्येत दररोज शेकड्यांनी वाढ होत आहे. ही वाढ चिंताजनक आहे. शासनाने राज्यातील काही भाग सीलबंद करण्याचे निर्णय घेतले आहेत. बंदी आदेश जारी केले आहेत. आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकलं जाईल. करोनाच्या संदर्भात शासन यापुढे अधिक धोका पत्करणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला आहे.


 असे असताना पंढरपूर येथील अनेक बँकांमधून नागरिकांनी सरकारकडून आलेली मदत खात्यां मधून काढून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे .कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची होणारी आर्थिक कुचंबणा लक्षात घेऊन शासनाच्यावतीने काही रक्कम खातेदारांच्या खात्यावर जमा केलेली आहे. ही रक्कम काढून घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.


तसेच पालेभाज्या, फळं ग्राहकांना घरबसल्या मिळावी यासाठी हातगाडीवरती विकण्यासाठी नगरपालिकेच्यावतीने परवानगी देण्यात आलेली आहे तरीही नागरिक दूध, भाजीपाला, पेट्रोल पंपावर गर्दी करत आहेत.

   एकीकडे राज्य आणि केंद्र शासन,उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सागर कवडे, पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तहसिलदार डॉ वैशाली वाघमारे,शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार आणि तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर , पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे आणि त्यांचे सहकारी तसेच नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश  भोसले,आरोग्य विभागाचे सभापती विवेक परदेशी आणि सर्व नगरसेवक गर्दी कमी व्हावी, नागरिकांना जंतूचा संसर्ग होऊ नये यासाठी जीवाची पर्वा न करता प्रयत्न करताना दिसत आहेत मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करताहेत ही बाब चिंताजनक आहे. 
 
Top