पंढरपूर (प्रतिनिधी) दि.१९/०४/२०२० - कोराना पार्श्वभूमीवर राज्यासह देशामध्ये लॉकडाऊन व संचारबंदीमुळे अनेक कुटुंबाचे हाल होत आहेत. अशा अडचणीत मदतीचा हात म्हणून हातावर पोट असणारे तसेच अल्पमानधनावर काम करणारे गरजु कलावंतांना सोशल डिस्टन्सचे पालन करुन जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप कल्याणराव काळे जनकल्याण युवा-मंचचेवतीने सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, युवा मंचचे अध्यक्ष सुधाकर कवडे, सदस्य अनिल नागटिळक यांचे हस्ते करण्यात आले.


   यावेळी गणेश गोडबोले, भास्कर व्यवहारे,हरी बारंगुळे,गोविंद पाटोळे, कोमल पाटोळे आदी कलावंत उपस्थित होते तसेच इतर कलावंतांना जीवनावश्यक वस्तु घरपोहोच करण्यात आल्या.  

 कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असून गरजु कुटुंबाना उदरनिर्वाह करणे जिकिरीचे बनले असल्याने त्यांना मदतीचा हात म्हणून शौक्षणिक संकुलच्या वतीने जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप करण्यात येत आहे. तालुक्यातील दिड हजारहून आधिक गरजु कुटुंबाना सोशल डिस्टन्सचे पालन करुन किट पोहोच करण्यात आल्या आहेत. 

     यावेळी सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी कोरोना या वैश्विक  आजाराचा शिरकाव आपल्या गावात,घरात कुटुंबात होवू न देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या, पोलिस प्रशासन व आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे. घरीच राहणे आणि स्वत: खबरदारी घेणे हा एकमेव उपाय असून सर्वांनी त्याचे पालन करावे असे आवाहन केले. 
 
Top