पंढरपूर ,(प्रतिनिधी) - सध्या देश कोरोना विषाणूच्या विरूध्द लढत असताना संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे.या विषाणू विरूध्द लढण्यासाठी प्रशासन सर्व स्तरावर रात्रंदिवस काम करीत आहे. त्यामध्ये आरोग्य विभागातील डॉक्टर्स,वॉर्ड बॉय, नर्सेस,अंगणवाडी सेविका, सफाई कर्मचारी तसेच पोलीस बांधव रात्रंदिवस आपल्या कुटुंबातील सदस्यांपासून दूर राहून काम करीत आहेत.


तसेच नाट्य कलावंत,ऑर्केष्ट्रा कलावंत जेे आपल्याला करमणुकीच्या माध्यमातून प्रबोधन करत असतात मात्र या संचारबंदी काळात त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने एक कर्तव्य म्हणून मदत करण्यासाठी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्यावतीने अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पंढरपूर अध्यक्ष डॉ मंदार सोनवणे आणि नियामक मंडळाचे सदस्य दिलीप कोरके यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू गहू, तांदूळ, साखर, तेल, दाळ, मीठ, चहा पावडर, मास्क इत्यादीचे वाटप करण्यात आले.


यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड, उपाध्यक्ष महेश पवार, अर्जुन जाधव,कलाकार राजू पुरंदरे,गणेश गोडबोले, प्रमोद राजहंस, संजय रणदिवे आदी उपस्थित होते.
 
Top