*आरोग्यदाई हेल्दी व्यंजन रेसिपी अंबिलवडे

सदर व्यंजन है आयुर्वेदिक दृष्टया अगदी पौष्टिक आहे.जुन्या व्यक्तिना यांची जाणीव असून अहमदनगर औऱंगाबाद ,बिड, जालना, परभणी, नांदेड मराठवाड़ा व विदर्भात हे व्यंजन प्रामुख्याने बनवतात.

यात गव्हाचा कोंडा असल्याने आपल्या शरीरास चांगले फायबर मिळते.याची चव थोड़ीफार अंबूस तिखट खुसखुसीत लागत असल्याने सर्वाना खाण्यास चविष्ठ लागते.
 
*लागणारे साहित्य - गव्हाच्या पीठाचा  कोंडा - दिड वाटी , गव्हाचे पीठ -एक वाटी , हरबरा दाळ -२ लहान चमचे ,पाणी १ तांब्या ,गोड़तेल लहान २ चमचे ,पोहे खान्याचे, कापलेला कांदा -एक , मीठ, तिखट,जीरे,लसुण चवीनुसार 

*कृती - दीड वाटी गव्हाच्या पिठाचा कोंडा (गव्हाचे पीठ चाळून रहिलेला किंवा घरगुती शेवया करतांना निघालेला कोंड़ा) रात्री झोंपताना १० ते ११ चे दरम्यान या कोंडयास (पोहे करतांना जसे पाणी लावतो तसे ) थोड़ेसेच पाणी लावून भिजवून सकाळपर्यत झाकुन ठेवावे.

 दुसऱ्या दिवशी करतेवेळी सकाळी ९ ते १२ चे दरम्यान केव्हाही ,त्या कोंडयाच्या पिठामध्ये १ वाटी गव्हाचं पीठ , २ चमचे सकाळी भिजवलेली हरबरा डाळ ,एक कापलेला कांदा,तिखट, मीठ, जिरे, लसूण,चवीनुसार कच्चेच टाकावयाचे आहे.

 वरील सर्व साहित्य एकत्र करुन आवश्यकतेनुसार पाणी टाकून पीठ मळून घ्यावे .

   नंतर त्याचे हाताने छोटे छोटे गोळे करत त्यांस दाखवले प्रमाणे चपट्या आकाराचे करायचे आहेत 

कढईत १ तांब्या पाणी, २ चमचा तेल टाकून ते उकळी येईपर्यंत तापु द्यावे.

 त्यात नंतर उकळी आलेले तेल व पाणी मिश्रित कढ़ईत आपण बनवलेले पिठाचे केलेले गोळे टाकून ते उकडून घ्यायचे आहेत . पाण्याचा थोड़ा रसा धरायचा व थोड़ावेळ स्टीमवर गैस बंद करुन ठेवायचे.  

नंतर कढ़ाई वरील झाकण काढ़ताच स्वादिष्ट आरोग्यदायी रेसिपी तयार झालेली असेल ......

शशिकला मनोहर कुटे पाटील, (नेवासा),
जि. अहमदनगर  मो.नं. ९२२६४२८७५६
 
Top