भाळवणी,(प्रशांत माळवदे)-पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र ,कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेली ग्रामस्तरीय समिती व ग्रामपंचायत यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,मुलींची येथे संशयित कोरोना विषाणूचा संसर्ग असलेल्या व्यक्तीस १४ दिवस अलगिकरण (कोरोनटाईन) करून ठेवण्यात येणार आहे.

     यावेळी हरिभाऊ शिंदे, शिवाजी गवळी,दिलीप भानवसे,पोलीस पाटील अर्जुन गवळी,धोंडीराम शिंदे,आरोग्य अधिकारी डॉ अभिजित रेपाळ, सुनील पाटील,उपसरपंच अंबादास कुचेकर,पी व्ही माळी,ए ए मस्के आदी उपस्थित होते

     डॉ रेपाळ म्हणाले,कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सोलापूरात सुरू झाला आहे. आपल्या भागात यांसाठी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे , म्हणून येथील मुलींच्या शाळेत विलगिकरण कक्ष सुरू करावा लागला आहे. ग्रामस्थांनी बाहेर न पडता घरातच बसून राहावे व स्वतःची काळजी घ्यावी,अन्यथा घराबाहेर बिनकामाचे फिरणाऱ्या व्यक्तीसही अलगीकरण कक्षेत ठेवले जाणार आहे.

 यावेळी सांगली जिल्ह्यातून आलेल्या ऊस तोडणी कामगाराची प्राथमिक तपासणी करण्यात आली. कोणीही तपासात संशयित रुग्ण सापडला नाही.
 
Top