राज्यात नव्या ११७ कोरोनाबाधितांची झालेली नोंद पुढीलप्रमाणे - मुंबई – ७२ , नवी मुंबई – ०१ , बुलढाणा – ०१ ,पुणे – ३६ , अकोला – ०१, ठाणे – ०३,कल्याण डोंबिवली – ०१ आणि पुणे ग्रामीण – ०२
देशात लॉकडाऊन जारी झाल्यापासून केंद्र आणि राज्य सरकार वेळोवेळी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असले तरीही कोरोना बाधितांचा वाढणारा आकडा चिंता वाढवत आहे. मात्र, असे असले तरीही देशात तसेच राज्यात अजूनही ‘कोरोना’च्या तिसऱ्या स्टेजला सुरुवात झालेली नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी आज ८ एप्रिलला पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. देशासाठी सद्यस्थिती हि अत्यंत दिलासादायक बाब आहे. तसेच हा संसर्ग इथेच रोखणेही तितकेच आवश्यक आहे.