नातेपुते,(श्रीकांत बाविस्कर) - लोकशाहीचा चौथा खांब असलेली पत्रकारिता हा समृध्द समाजाचा भक्कम आधार आहे शासन आणि जनतेमधील मुख्य दुवा असणारा हा खांब
राज्यात कोरोना सारख्या महाविषाणूचा फैलाव जोरात सुरु असतानाही जागृत पत्रकारिता करित आहे तसेच कोरोनाच्या संकटाचा सामना महाराष्ट्रातील जागृत नागरिकही करीत आहेत.केंद्र व महाराष्ट्र शासनाने जनता कर्फ्यू व लॉकडाऊन सारखे अनेक चांगले मोठे निर्णय घेतले पासुन पोलीस,डॉक्टर व त्यांचा स्टाफ, प्रशासकीय यंत्रणेबरोबर पत्रकार,प्रेस फोटोग्राफर बांधवही आपल्या जिवाची पर्वा न करता जनजागृती व प्रसिद्धि करीत आहेत .

  डाॅक्टर,पोलीस अथवा,शासकीय अधिकारी यांचे आर्थिक नियोजन फिक्स आहे परंतु पत्रकारांना अत्यंत तुटपुंजा पगार असतो. ब-याच पत्रकारांचे आर्थिक नियोजन हे जाहिरातीचे कमिशनवर अवलंबून आहे.सद्धस्थितीत जाहिराती बंद आहेत. अनेक पत्रकार आर्थिक अडचणीत आले आहेत. या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पत्रकारांना खूप अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.तेंव्हा पत्रकार मग तो प्रिंट मिडीयाचा असो किंवा इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा असो सर्वांचे अडी - अडचणीत न्याय मिळवुन देणारे पत्रकारच अडचणीत आले आहेत. बातमीसाठी त्यांना अनेक ठिकाणी फिरून बातमी गोळा करावी लागते. यामुळे इतरांना जसे विमा संरक्षण आहे तसेच *पत्रकारांनाही विमा संरक्षण*  मिळावे व या सर्व बाबीचा गांभीर्याने विचार करून अन्य घटकांप्रमाने पत्रकारांनाही *विशेष आर्थिक मदतीचे पँकेज* द्यावे तसेच या कालावधीत *पत्रकारांच्या वाहनांना पेट्रोल/डिझेल* चा पुरवठा सुरळीतपणे  व्हावा अशी विनंती डाॅ.धवलसिंह प्रतापसिंह मोहीते पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 
 
Top