पंढरपूर,(विजय काळे)- सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या विरूध्द लढत असताना संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे.या विषाणू विरूध्द लढण्यासाठी प्रशासन सर्व स्तरावर रात्रंदिवस काम करीत आहे. त्यामध्ये आरोग्य विभागातील डॉक्टर्स,वॉर्ड बॉय, नर्सेस,अंगणवाडी सेविका, सफाई कर्मचारी तसेच पोलीस बांधव रात्रंदिवस आपल्या कुटुंबातील सदस्यांपासून दूर राहून काम करीत आहेत.
प्रशासनातील अशा बांधवाना एक कर्तव्य म्हणून मदत करताना अनेक व्यक्ती,संघटना, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी मदत करताना दिसत आहेत.

पंढरपूर शहरातील दाळे गल्ली तालीम तरुण मंडळाच्या वतीने लॉकडाऊन काळात नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना माजी नगरसेवक किरणराज घाडगे यांचे मार्गदर्शनाखाली पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले.

यावेळी विकी मोरे ,शुभम आटकळे,सोमनाथ चव्हाण,रवी घाडगे,बंटी वाघ,मासाळ, नागेश वाघ, सोमनाथ आटकळे,नगरपरिषदेचे श्री तोडकर आदी उपस्थित होते.
 
Top