मुंबई, - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगवान महावीर जयंतीनिमित्तानं राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. 


 भगवान महावीरांनी अखिल विश्वाला मानवतेच्या कल्याणाचा विचार दिला. प्राणीमात्रांवर प्रेम, दया करायला शिकवलं. शांतता, अहिंसा, बंधुत्वाच्या माध्यमातून या जगाचं कल्याण होऊ शकतं हा त्यांचा विचार आपण सर्वानी आचरणात आणला पाहिजे, असे उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. 
 
Top