पंढरपूर - आज येथील प्रभाग २ मध्ये दाळे गल्ली,कडबे गल्ली, ज्ञानेश्वर झोपडपट्टी परिसरा तील कष्टकरी, मोलमजूरी करणाऱ्या लोकांना कोरोनाच्या महामारीमुळे कामे बंद असल्याने उपासमारीला सामोरे जावे लागत असताना या संकटाच्या काळात सदैव गरीबांना मदतीचा हात पुढे करणारे माजी उपनगराध्यक्ष धर्मवीर शिवाजी आप्पा कोळी यांनी आणि त्यांच्या लोकमत गणेशत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर जिल्हयाचे आमदार प्रशांत परिचारक यांचे हस्ते १०० कुटूंबाना १० दिवस पुरेल इतका धान्यशिधा, भाजीपाला देवून मोठा दिलासा दिला.



यावेळी उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव,पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, आनंद कोळी,माजी नगरसेवक सुखदेव माने,लोकमत गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top