...कोरोना ग्रामस्तरीय दक्षता कमिटीचा निर्णय...राजुबापु पाटील यांची माहिती

पंढरपूर ,(विजय काळे)-तालुक्यातील मौजे भोसे येथे कोरोंना विषाणू संक्रमण रोखणेसाठी भोसे (क) हद्दीत दिनांक २९ एप्रिल ते १ मे २०२०या कालावधीत “जनता कर्फ्यू ” जाहीर करण्यात आला आहे .या काळात भोसे गाव व वाड्यावस्त्या सह १००टक्के बंद “ पाळण्यात येणार आहे. या जनता कर्फ्युच्या कालावधीत दूध संकलन सकाळी ७ व सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत करण्यात यावे . या शिवाय दूध उत्पादक रस्त्यावर दिसल्यास दूध उत्पादक शेतकरी व डेअरी चालक यांना ५०० रु दंड व पोलिस गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या जनता कर्फ्यु कालावधीत वैद्यकीय सेवा दवाखाने २४ तास सुरू राहतील .मेडिकल दुकान सकाळी ८ ते ९ या वेळेतच सुरू राहतील .वैद्यकीय अत्यावश्यक सेवा दवाखान्यात उपलब्ध आहे.


सर्व ग्रामस्थांना विनंती करण्यात येते की ,
कोणीही घराबाहेर पडू नये.घरातच रहा ,सुरक्षित रहा !सर्वांनी जनता कर्फ्यूला सहकार्य करावे आणि आपले गाव कोरोंनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी जनता कर्फ्युत सहभाग नोंदवावा तसेच भोसे ग्रामस्थांनी या ३ दिवसाच्या जनता कर्फ्यूमध्ये कोरोना ग्रामस्तरीय समितीने दिलेल्या सर्व सुचनाचे काटेकोरपणे पालन करावे. शिवेच्या रस्त्यावरून आपल्या गावात कोणीही अनोळखी व्यक्ती येणार नाही. याची खबरदारी तेथील नागरिकांनी घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजुबापू पाटील यांनी केले आहे.
संचारबंदी दरम्यान भोसे गावठाण व वाड्यावस्त्या वर घराबाहेर कोणीही पडू नये.तसेच एसटी स्टँड , शॉपिंग सेंटर,जुनी चावडी ,हनुमान मंदिर,महादेव मंदिर,जानुबाई मंदिर,यशवंतराव महाराज मंदिर , दर्गा ,मशीद (दोन्ही ),चौक ,पार,खंडोबा मंदिर व इतर सार्वजनिक ठिकाणी कोणीही फिरू नये अन्यथा ५०० रु दंड व पोलिस गुन्हा नोंद करण्यात येईल.
    संचारबंदी काळात दुचाकी वाहने तसेच चार चाकी वाहने व इतर कोणतेही वाहन आढळून आल्यास वाहन जप्त करण्यात येतील.

  या काळात हॉटेल व सर्व किराणा मालाची दुकाने व रेशन दुकान १०० टक्के बंद राहतील. हॉटेल पार्सल बंद राहतील . दुकान अथवा हॉटेल चालू दिसल्यास ५०० रु दंड व पोलिस कारवाई करण्यात येईल .
 
Top