नातेपुते (श्रीकांत बाविस्कर) : डॉक्टर धवलसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उप-मुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन गहू तांदळा सोबत घरात लागणारे चहा,साखर, तेल, डाळी मोफत देण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. 

  संपूर्ण भारतात कोरोना व्हायरसमुळे लाॅकडाऊन केले आहे या परिस्थितीत गोरगरिब जनतेचे अत्यंत हाल होत आहेत. छोटे छोटे उद्योग धंदेवाले, चहा टपरी, वडापाव ,रिक्षाचालक असे अनेकांना हाताला काम नसल्यामुळे आणि जवळचे पैसे संपल्यामुळे ही कुटुंबे अन्नापासुन वंचित राहत आहेत .मोलमजुरी करणारे लोकांना धड रोजगार हमीवर पण कामाला जाता येत नाही यामुळे अशा लोकांचे तर भयंकर हाल होत आहेत.

  आमची जनसेवा संघटना व अशा अनेक सामाजिक संघटना आपआपले परिने मदत करीत आहेत पंरतु सर्व लोकांना मदत करने शक्य नाही आणि त्यांची परस्थितीही नाही. लाॅकडाऊन आहे
त्यामुळे लोकांची काम करायची इच्छा असुनही काम करू शकत नाही .

      महाराष्ट्र राज्यामध्ये संताच्या विचाराचे सरकार आहे व आपले सारखे संवेदनशील मुख्यमंत्री त्याचे नेतृत्व करित आहात.महाराष्ट्रातील थोर संताचे परंपरेनुसार महाराष्ट्र शासनाने या परस्थितीत वरिल सर्व बाबीचा संवेदनशील मनाने विचार करून महाराष्ट्रातील सर्व गोरगरिब जनतेला मदत म्हणुन गुह,तांदुळ याबरोबरच तेल चहा,साखर,व डाळी या वस्तु लाॅकडाऊन कालावधीत पुरेल इतके मोफत वाटप करावे अशी विनंती आपणास करित आहे तसेच सदर धान्य व साहित्य वाटप हे त्या त्या भागामध्ये जाऊन वाटप करणेची व्यवस्था करावी म्हणजे गरजु माणसाला लाभ मिळेल व भ्रष्टाचार होणार नाही तरी वरील बाबींचा विचार करून लवकरात लवकर निर्णय घेणेबाबतचे निवेदन उद्धव ठाकरे , मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे डाॅ.धवलसिंह प्रतापसिंह मोहीते पाटील यांनी दिले आहे
 
Top