पंढरपूर, (प्रतिनिधी)-पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत २९ एप्रिल २०२० रोजी सकाळी ८.०० दुपारी २.०० वाजेपर्यंत पंढरपूर शहरातील अत्यावश्यक सेवेमध्ये येणारे पंढरपूर शहरातील भाजीफळ विक्रेते पासधारक व्यापारी यांचे पासेस चेक करण्याचे व सोशल डिस्टन्स राखण्याचे काम पंढरपूर नगरपरिषद कार्यालयाकडील चिदानंद उत्तम सर्वगोड, नगरपरिषद कार्यालय लिपिक, राहणार पंढरपूर व त्यांचे सोबतचे नगरपालिके कडील स्टाफ काम करत असताना शहरातील नवी पेठ येथे भाजीविक्रेता अंबादास रामकृष्ण सुरवसे या नावाच्या व्यक्ती जवळील पासची शंका आल्याने त्याबाबतची खात्री करता सदर पासवरील सही तसेच पाससाठी वापरण्यात आलेल्या कागदावरून सदरचा पास बनावट असल्याचे आढळून आलेने पंढरपूर शहरात पेट्रोलिंग पोलिस कर्मचारी यांच्यासह सदर बनावट पास विक्री करणारा सुरज मनोहर जाधव,राहणार महावीरनगर पंढरपूर आणि बनावट पास बनवून तयार करणारा उमेश मोहन छत्रे , राहणार महाविर नगर, पंढरपूर असे मिळून आल्याने त्याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात चिदानंद उत्तम सर्वगोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांनी गुन्हा दाखल केला आहे असून सदर गुन्ह्यांमध्ये सुरज मनोहर जाधव , उमेश मोहन छत्रे ,राहणार पंढरपूर यांना पंढरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सदरचा तपास पोलीस अधीक्षक,सोलापूर ग्रामीण मनोज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी विभाग पंढरपूर, डॉ. सागर कवडे यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा त्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री क्षीरसागर करीत आहेत.

तरी पंढरपूर वासियांना आवाहन करण्यात येते की,अशा प्रकारे शासनाकडील संपूर्ण महाराष्ट्र लाँकडाऊनबाबत घोषणा पत्रक प्रसिद्ध करून संचारबंदी आदेश लागू केलेले असतानाही अशा प्रकारचे बनावट पासेसचा वापर करून मोठ्या प्रमाणात फळभाजी विक्रेते घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणू पसरत असून वेगाने मृत्यू घडून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून कोणीही घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात आल्या असून देखील स्वतःसह इतरांच्या जीवितास धोका होऊ शकतो असे खोटे बनावट ओळखपत्र, प्रमाणपत्रांचा वापर करताना मिळून आल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे पंढरपूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी स्पष्ट केले आहे.
 
Top