नातेपुते(श्रीकांत बाविस्कर) - सध्या कोरोना या रोगाने लाँकडाऊन काळात संचारबंदीमुळे  अकलूज परिसरात हातावर पोट असलेली घर  काही कामधंदा करू शकत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.


 त्यामुळे सुरेश ठोंबरे युवामंच मंडळाच्या ठोंबरे परिवाराच्यावतीने नातेपुते येथे जीवनावश्यक अन्न धान्य तांदूळ, गहू, साखर,शेंगदाणे तेल,तूर,चहापत्ती ,कांदा बटाटा, घरगुती सामानाचे किट अशा अनेक वस्तूंचे वाटप केले असून सदरचे वाटप सुरेश ठोंबरे युवा मंच व ठोंबरे परिवाराच्यावतीने त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी घरोघरी जाऊन हे धान्य गरजूवंतांना अशा उपासमारीच्या आणि महामारीच्याच्या संकट काळात पोहचवण्यासाठी परिश्रम घेतले.
 
Top