मुंबई, -सहकार क्षेत्रातील समस्या जाणून घेण्यासाठी तसेच येणार्या काळात अपेक्षित उपाय योजनांबाबत सहकार क्षेत्रात काम करणार्या मान्यवरांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,विधान सभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा.प्रताप पाटील चिखलीकर,खा.कपिल पाटील,अमरिश पटेल, राजे समरजितसिंग घाडगे, सुभाषबापू देशमुख, डॉ. राहुल अहेर, सुभाष आकरे, रणजितसिंह मोहिते पाटील, नितीन बनकर, अतुल भोसले, दीपक पटवर्धन, प्रकाश आव्हाडे, शेखर चरेगावकर, प्रमोद कर्नाड, पृथ्वीराज देशमुख, हरिभाऊ जावळे, सतीश मराठे, संदीप देवकाते, किशोर शितोळे, युवराज मुळीक, सुभाष मयेकर इत्यादी सहभागी झाले होते. साखर, दूध उत्पादकांचे प्रश्न, परिणामी शेतकर्यांना होत असलेला त्रास, धान उत्पादकांचे प्रश्न, कांदा उत्पादक शेतकर्यांची व्यापार्यांकडून होत असलेली अडवणूक,अर्बन बँका, नागरी पतसंस्थांचे प्रश्न, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी करावयाच्या उपाययोजना इत्यादीं बाबत सविस्तर चर्चा झाली.
सहकार क्षेत्रातील समस्या ऐकून घेतल्यानंतर टप्प्या-टप्प्याने आता हे प्रश्न सोडविण्यासाठी रिझर्व्ह बँक , केंद्रीय वित्तमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येईल. जे प्रश्न राज्य सरकारकडे आहेत, त्यासाठी राज्य सरकारकडे सुद्धा पाठपुरावा करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केले.