महावितरण कंपनीने लाँकडाऊन काळात रिडींग घेणे शक्य नसल्याने सरासरी शुल्क आकारण्याचा घेतलेला निर्णय सारासार चुकीचा आहे.यावर उपाय म्हणून त्यांनी वितरण कंपनीचा अँप डाऊनलोड करून आपलं रिडींग कळविण्याचा पर्याय दिलेला आहे.हा पर्याय किती टक्के लोकांना शक्य आहे.ग्रामीण भागात तर कनेक्टिव्हिटीची मोठी समस्या आहे.तिथ अँपच लोड होणार नाही. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे काही अत्यावश्यक सेवा सोडल्यास इतर अनेक आस्थापना,दुकाने, बेकरी,कोल्ड्रिंक्स हाऊस तसेच छोटे मोठे उद्योग, कारखाने पूर्णपणे बंद आहेत.त्यामुळे वीज वापरण्याचा प्रश्नच येत नाही. मग अशावेळी कोणतही रिडींग न घेता पूर्वीच्या बिलावर आधारित सरासरी बिल आकारण्याचा निर्णय हा चुकीचा आणि वीजग्राहकावर अन्याय करणारा आहे.

    काही वर्षापूर्वी तीन महिन्यांत एकदा बिल येत होत.आताच्या आणीबाणीच्या परिस्थितीत मुळातच त्रासलेल्या जनतेला दिलासा द्यायचा सोडून अशा पध्दतीने वसुली करणे योग्य नाही. आताची परिस्थिती पुर्वपदावर आल्यानंतर रितसर रिडींग घेऊनच शुल्क आकारावे अशी ग्राहकांची मागणी आहे.

     ग्राहक संरक्षण परिषद सिंधुदुर्ग विज वितरण कंपनीला अशी विनंती करत आहे की कंपनीने सद्यस्थितीचा गांभीर्याने विचार करुन ग्राहकांना दिलासा द्यावा ,अशी मागणी अँड.नकुल पार्सेकर,
अशासकीय सदस्य, ग्राहक संरक्षण परिषद, सिंधुदुर्ग यांनी केली आहे. 
 
Top