पंढरपूर - राज्यातील संचारबंदी व कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यूच्या चौदा दिवसानंतर हातावर पोट असलेल्या कुटुंबाची चूल पेटणं अवघड होवून बसलं होतं.त्यामुळे गोरगरीब, मोलमजुर,निराधार,गरजवंतांना व हातावर पोट असणाऱ्या पंढरपूर शहरातील जे भटकंती करून आपले पोट भारतात अशा कुटुंबियांना भाजी पाला वाटप करण्यात आले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व ना जयंत पाटील,जिल्ह्याचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड व पंढरपूर मंगळवेढाचे आमदार भारत भालके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचेवतीने जेष्ठ नेते सुभाष भोसले,प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे जिल्हा सचिव सुरज पेंडाल ,शहराध्यक्ष संदीप मांडवे, कथले सर,स्वप्नील लेंगरे ,सुरज कांबळे,  अभिनव श्रीकांत शिंदे ,अल्पसंख्याकचे शहराध्यक्ष रशीद शेख व राष्ट्रवादी शहर सचिव विजय काळे उपस्थित होते.
 
Top