नातेपुते ,(श्रीकांत बाविस्कर)- कोरोना रोगाचा प्रसार होऊन नये म्हणुन देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी होत आहे. शासनाने यात्रा, जत्रा, सार्वजनिक सभा, समारंभ कार्यक्रमांवर बंदी घातली आहे.शिखर शिंगणापुर येथील शंभो महादेवाचे मंदिर बंद केले असून यात्रा कमिटीने यात्राही रद्द केली आहे.शिंगणापुरकडे येणारे सर्व मार्ग बंद केल्याने भाविक भक्तांनी येणे बंद केल्या मुळे शिंगणापुर येथील माकडाची मोठ्या प्रमाणा वर उपासमार होऊ लागली होती. 


भाविकांचे येणे जाणे सुरु आसल्यास माकडांच्या खाण्यापिण्याची सोय भाविकांच्या माध्यमांतून होत होती. 


    कोरोनामुळे भाविकांच्या येण्यावरती बंदी असल्यामुळे सुमारे चारशे ते पाचशे वानरांची उपासमार होत होती.त्यामुळे नातेपुते येथील अहिंसा सेवा समितीचे अध्यक्ष अविनाश दोशी यांनी त्यांच्या शेतातील १३०० किलो केळी टॅम्पोत भरून शिंगणापूरला पाठवली असून माकडांची होणारी उपासमार थांबवली आहे. 

 रस्ते बंद असल्यामुळे शिंगणापूर येथील कार्यकर्ते विरभद्र कावडे, दादाशेठ चौधरी,राजु पिसे,योगेश जळक,नितीन माने, सोमा ठाकरे, विकास झांबरे यांनी केळी आणण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.
 
Top