पंढरपूर - संपूर्ण जगभरात कोरोना रोगाने थैमान घातले आहे.भारतात हीच परिस्थिती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लाॅक डाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत जनतेची अवस्था बिकट झाली आहे. कोरोनामुळे आर.बी. आयने कर्जदारांची वसुली थांबवली आहे.तरीही ग्राहकांना संकटसमयी सहकार्य करून त्यांना आधार देण्याचे काम करायचे सोडून बजाज फायनान्सकडून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचे काम चालू केले आहे.ग्राहकांनी बजाज फायनान्स कंपनीकडून हप्त्यावर कर्जाच्या स्वरूपात घेतले त्या कर्जदारांना नियमांचं उल्लंघन करून २४ टक्के व्याजदराची भिती दाखवून ग्राहकांचे चेक बाऊंस करून हप्ते वसुली बजाज फायनान्स करत आहे.ते बेकायदेशीर आहे.  ग्राहकांनी तात्काळ पोलिस स्टेशनला जाऊन फिर्यादी दाखल कराव्यात. बजाज फायनान्साच्या कोणत्याही लिंकवर जाऊन त्यांच्याकडे विनवणी अर्ज करण्याची गरज नाही. त्यामुळे चेक बाऊंसला न घाबरता फिर्यादी दाखल करा.ज्या वेळेस कोरोना संकट देशावरील जाईल त्यावेळेस हप्ते भरून आपण बजाज फायनान्सला सहकार्य करू.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बजाज फायनान्सने ग्राहकांना त्रास देण्याचा प्रकार केलातर आर.बी आयने बजाज फायनान्सचा परवाना रद्द करावा अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
 
Top