पंढरपूर ,(प्रतिनिधी)- पंढरपूरात तहसिल कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या उपकारा गृहातील आरोपींना पंढरपूर शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने भोजन व कोरोना प्रतिaबंधक साहित्याचे वाटप करण्यात आले.

 पंढरपूरच्या उपकारागृहात किरकोळ गुन्हयात न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या आरोपींना यापुर्वीच जामीनावर सोडण्यात आले आहे मात्र अदयापही चार कोठडीत मिळून ८0 आरोपी आहेत.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर असलेल्या लॉक डाउनमुळे या आरोपींची गैरसोय झाली होती.मात्र तहसिलदार वैशाली वाघमारे यांनी विविध सामाजिक संघटनांची मदत घेवून या आरोपींची सोय करीत आहेत.पंढरपूर शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने उपकारागृहात असणाऱ्या ८0 आरोपींसाठी फुड पॅकेट,मास्क तसेच सॅनिटाझर उपलब्ध करुन देण्यात आले.आज या सर्व साहित्याचे वाटप तहसिलदार वैशाली वाघमारे यांच्या हस्ते व शिवसेनेचे पंढरपूर जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे,माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ अभंगराव,जंयंवत माने, शहर प्रमुख रवि मुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या प्रसंगी उपशहरप्रमुख विनायक वनारे विभाग प्रमुख तानाजी मोरे तसेच नायब तहसिलदार तिटकारे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top