सांगली - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्या साठी देशभरात सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केले आहे.या लॉकडाऊन काळात वीर सेवा दलाने आपली सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात जवळपास शंभरहून अधिक शाखांतर्गत गावांमध्ये मदत कार्य सुरू केले आहे. यामध्ये रुई, नरंदे,हुपरी, कुंभोज,मिणचे, कोथळी, कसबा सांगाव ,समडोळी,भिलवडी ,तुंग, नेज, किणी,कबनूर,व्हन्नूर,कुरुंदवाड,रुईकर कॉलनी, अर्जुनवाड,रांगोळी,शहापूर,वसगडे,कोरोची,यड्राव,बोरगांव, बेडकिहाळ, मलिकवाड, शमनेवाडी, भोज, मांगुर यांसह अनेक शाखांमधून मदत कार्य करण्यात आले आहे.यामध्ये अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी,आरोग्य व आशा सेविका, पोलिस,ग्रामपंचायत व प्रशासकीय अधिकारी, सफाई, महावितरण कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायझर,जीवनावश्यक वस्तू,फळे ,भाजीपाला यांचे वाटप करण्यात आले.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या वीर सेवा दलाच्या शाखांनी यावर्षी भगवान महावीर जयंती निमित्ताने होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करून गेल्या एक महिन्यां पासून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती व गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत आहेत असे वीर सेवा दलाचे चेअरमन शशिकांत राजोबा, व्हा.चेअरमन भूपाल गिरमल, सेक्रेटरी एन.जे. पाटील,जॉ. सेक्रेटरी रावसो कुणुरे,मुख्य संघटक सुभाष मगदूम यांनी सांगितले आहे.
अनेक गावांमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.निर्जंतुकीकरण करण्या साठी औषध फवारणी,स्वच्छता मोहीम,तसेच गरजु कुटूंबाना धान्य व भाजीपाला वाटप करण्यात आले.जवळपास एक हजारहुन अधिक ऊसतोड मजुर व गरजु कुटुंब यांच्या चहा,नाष्टा व जेवणाची सोय करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.या महामारीच्या काळात वीर सेवा दल मध्यवर्ती,प्रांतिय,जिल्हा,तालुका समिती,संलग्न संस्था व शाखा सदस्य,स्वयंसेवक मदत कार्यात कार्यरत आहेत.

  वृध्द सेवाश्रम कुपवाड़,बाल आधार केंद्र सांगली, सांगली-मिरज-कुपवाड़ महानगरपालिका संचलित उपायुक्त पराग कडवळे व विशाल भगत यांच्या पुढाकाराने २०० परप्रांतीय लोकांच्या भोजना करिता सुरू असलेले अन्नछत्र या सेवाभावी संस्थांचा समावेश आहे. या संस्थाना विविध प्रकारचा भाजीपाला या परिसरातील भाजीपाला उत्पादक शेतकरी सर्वश्री सचिन ढंग ,संदीप मगदुम ,जयकुमार बेले,राजेन्द्र वठारे (समडोली) , क्रांतिकुमार पाटील, नेमिनाथ चौगुले (नान्द्रे), शरद पाटील वसगड़े यांचे सहकार्याने लाभले. 

या उपक्रमाचे नियोजन अध्यक्ष शशिकांत राजोबा यांचेसह एन.जे.पाटील,अरुण पाटील, जयकुमार बेले,जे.जे.पाटील,राजकुमार ढोले, प्रवीण कोले, शीतल मसूटगे, शीतल शेडबाले, पार्श्वनाथनगर शाखा संघनायक अविनाश पाटील व सदस्य यांनी केले.
 
Top