माळशिरस -माळशिरस तालुक्यातील रत्नत्रय पतसंस्था, सदाशिवनगर यांचेकडून सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, अकलूज यांच्याकडे शनिवार दिनांक ०४ /०४/ २०२० रोजी १० किट (जीवनावश्यक वस्तू) मंडलाधिकारी संदीप चव्हाण यांच्याकडे रत्नत्रय पतसंस्थेचे संस्थापक अनंतलाल दोशी,चेअरमन वीरकुमार दोशी, व्हाईस चेअरमन संजय गांधी यांनी जमा केले. 


या वाटपप्रसंगी संस्थेचे सचिव ज्ञानेश राऊत, तलाठी भाऊसाहेब मनोज शहा, संजय शिंदे , हरिभाऊ पालवे व नवनाथ ओवाळ आदी उपस्थित होते. 

 रत्नत्रय पतसंस्था ही सभासदांचे हित जोपासत असतानाच ज्यावेळी समाजामध्ये अडीअडचणी येत असतात त्यावेळेला माणुसकीच्या दृष्टिकोना तून पतसंस्थेने नेहमी मदतीचा हात दिलेला आहे. संस्थेचे संस्थापक अनंतलाल दोशी यांच्या संकल्पनेतून रत्नत्रय पतसंस्थेच्या माध्यमातून अडचणीत असणाऱ्या जनतेसाठी खारीचा वाटा असावा या उदात्त हेतूने त्यांनी सर्कल यांच्यामार्फत जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले असे चेअरमन वीरकुमार दोशी यांनी सांगितले. 
 
Top