सोनके ,(सुधाकर खरात )-करोना व्हायरस covid-19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा व्हायरस संसर्गजन्य स्वरूपाचा असल्याने देशभरात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे तातडीने खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याने सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.


त्यामुळे ज्यांचे हातावर पोट असलेल्या लोकांना आर्थिक मदत व्हावी यासाठी तिसंगी,ता.पंढरपूर येथे पवार सर, अविनाश बाबर, पोलिस पाटील स्वप्नील लोखंडे, तलाठी अमर पाटील यांच्यासह ग्रामस्थ तरुणांनी एकत्र येऊन २५ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.


यावेळी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे,पोलिस पाटील स्वप्नील लोखंडे, तलाठी अमर पाटील यांच्यासह ग्रामस्थ तरुणांच्या हस्ते शिधा वाटप करण्यात आले.
 
Top