टाकळी सिकंदर - टाकळी सिकंदर ,तालुका मोहोळ ,सोलापूर येथे लोककलावंत बहुरूपी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्यावतीने मोहोळ तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू गहू, तांदूळ, साखर इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.


यावेळी दिलीप धोत्रे,मोहोळ तालुकाध्यक्ष कैलास खडके,पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, मोहोळ शहरअध्यक्ष शाहू देशमुख, तालुका उपाध्यक्ष बालाजी वाघ, मंडळ अधिकारी कोळी साहेब, तलाठी माने ,सरपंच दिनेश चव्हाण ,सुनील चव्हाण, शिवाजी चव्हाण, ग्रामसेवक शशीभूषण महामुनी, अमोल कोळी, समाधान डूबल इत्यादी उपस्थित होते.
 
Top