माळशिरस,(श्रीकांत बाविस्कर) - कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने देशात लाॅकङाऊन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकङून गर्दी करणार्यावर कारवाई सुरू आहे. त्यामुळे ११ एप्रिल रोजी महात्मा फुले  व १४ एप्रिल रोजी ङाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रत्येकाने घरीच साजरी करावी असे आवाहन माळशिरस ,जि.सोलापूरचे माजी सरपंच विकास धाईजे यांनी केले आहे. 

माळशिरस तालुक्यात महात्मा फुले  व ङाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येतात. पण यंदा कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने कङक उपाययोजना राबवल्या गेल्या आहेत. तरी गर्दी टाळण्यासाठी महात्मा फुले व ङाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती घरामध्येच सर्व कुटुंबाने एकत्र येत प्रतिमा पूजन , बुध्द पूजा घेऊन साजरी करावी व या दिवशी गरजू व गरीब लोकांना अन्न धान्य वाटप करावे.लोकांनी अफवां वर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे कोरोनापासून स्वतःचे , कुटुंबाचे , समाजाचे पर्याने देशाचे संरक्षण करणे हीच खरी आदरांजली या दोन महापुरूषांच्या जयंतीदिनाच्या निमित्ताने ठरेल असे प्रतिपादन विकास धाईजे यांनी बोलताना केले.
 
Top