नातेपुते,(श्रीकांत बाविस्कर)-कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना छोट्या मोठ्या प्रमाणावर दान करायचे आहे त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आपले योगदान द्यावे असे आवाहन केले होते. 

  त्या आव्हानाला प्रतीसाद म्हणून व कोरोना ग्रस्तांना आधार देण्यासाठी नातेपुते येथील माजी प्राचार्य  शहानुर मुल्ला व त्यांच्या पत्नी माजी मुख्याध्यापक नजमा मुल्ला यांनी नातेपुते येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचा एक लाख रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून बँकेत भरण्यासाठी बँकेचे मॅनेजर रुपनवर यांना दिला.

   कोरोनामुळे लॉकडाऊन वाढत चालला आहे. अनेक लोकांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  केलेल्या आव्हानाला पुढे येऊन ज्यांना मदत  करणे शक्य आहे अशांनी मदत करावी असे आवाहन शहानुर मुल्ला व त्यांच्या पत्नी नजमा मुल्ला यांनी यावेळी केले आहे.
 
Top