रक्तदाते विजय लोहार यांना प्रमाणपत्र देताना प्रणव परिचारक व डॉक्टर विलास जाधव आदी (छाया अमोल कुलकर्णी)

खर्डी (अमोल कुलकर्णी )-पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे ग्रामपंचायत व पंढरपुरातील रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.खर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात पूर्ण दक्षता घेऊन सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

जागतिक कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची संभाव्य गरज लक्षात घेऊन हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.त्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास जाधव,आरोग्य सेविका अर्चना माळी, संजय मोरे, लक्ष्मण साबळे,अण्णा पवार यांचेसह आरोग्य सहाय्यक व कर्मचारी उपस्थित होते.

     यावेळी खर्डी गावचे सरपंच रमेश हाके , उपसरपंच प्रणव परिचारक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top