पुणे- वालचंद इंडस्ट्रीज लि.वालचंदनगर यांच्या स्वमालकीचे ४० बेडचे अत्याधुनिक हॉस्पिटल आहे संबंधित कंपनीला आज ते शासनाला कोरोनाच्या उपचारासाठी द्यावे ही विनंती पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली असता वालचंद इंडस्ट्रीज लि.वालचंदनगर यांनी ते त्वरित उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले. 


लॉकडॉऊनच्या काळात ग्रामीण भागातील जनतेस जनावरांसाठी औषधसाठा कमी पडू नये यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पशुसंवर्धन विभागा मार्फत स्वस्त दारात औषधे उपलब्ध करून दिली आहेत. पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी पशुपालकांच्या दारात जाऊन पशु वैद्यकीय सेवा देत आहेत. 


कोरोना प्रतीबंधात्मक बंदकाळात महाराष्ट्रातील माझ्या पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी पशुपालकांच्या दारात जावून पशुनां पशुवैद्यकीय सेवा देत आहे त्यांचे मला विभागाचा राज्यमंत्री म्हणुन कौतुक आहे देशावर व राज्यावर आलेल्या या संकटाला सर्वांनी एकजुटीने सामोरे गेले पाहिजे असे पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे. 
 
Top