सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सोलापूर शहरात संपूर्ण संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.कारण सोलापूर शहरात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत सतत वाढ होत असल्याने उद्या (सोमवार) दुपारी ०२ वाजल्या पासून ते गुरुवारी ता.२३ रात्री १२.०० वाजेपर्यंत सोलापूर शहरातील सर्व हद्दीत बंद करण्यात येणार आहेत.
या आदेशातून अत्यावश्‍यक वैद्यकीय सेवा पुरवणारे खासगी, सरकारी रुग्णालये, दवाखाने, आरोग्य सेवा देणारे डॉक्‍टर, वैद्यकीय सेवेशी संबंधित कर्मचारी, त्यांची वाहने , एसएआरआय, आयएलआय व कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग यासंदर्भात सर्वेक्षण करणारे अधिकारी , कर्मचारी, अँम्ब्युुलन्स सेवा, रुग्णालयांत व दवाखान्याच्या संलग्न असणारी औषधांची दुकाने व अन्य औषधांची दुकाने त्यांच्या नियमित वेळी सुरू असणार आहेत . कायदेशीर कर्तव्य बजावणारे अधिकारी व कर्मचारी यात पाणीपुरवठा, अग्निशमन, विद्युत पुरवठा, पोलिस विभागातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना या संपूर्ण संचारबंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.या कालावधीत सोलापूर शहरातील सर्व अस्थापना व शहराच्या सर्व हद्दी बंद करण्यात येणार आहेत.

 असे असले तरी सोलापूरसह पंढरपूर आदी ठिकाणी झोपडपट्टी भाग असेल अथवा अन्य  भाग कोरोना या आजाराचे गांभीर्य अजिबात नाही. गल्लीतील सर्व शेजारीपाजारी सकाळी, संध्याकाळी गोळा होऊन गप्पा मारत बसतात , रस्त्यावर फिरत असताना दिसत आहेत.जसे काही यांना उन्हाळ्याची पगारी सुट्टी शासनाने दिली आहे.यात अशिक्षित आहेत ,सुशिक्षीत आहेत. पोलीस गाडी दिसली किंवा सायरनचा आवाज आला की पांगापांग होते पुन्हा एकदा यांचा कार्यक्रम सुरू.झोपडपट्टी अथवा दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांनी फिरून कारवाई करावी. रस्त्यावरून मावा गुटखा खावून थुंकणारे अनेक बहाद्दर आहेत तसेच दारू पिऊन फिरणारे यांचे प्रमाण कमी झाले असले तरी चालूच आहे . याबाबत शासकीय यंत्रणेने लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई केली जावी ही अपेक्षा. 
 
Top