शेळवे,(संभाजी वाघुले)- संपुर्ण जगाला व भारत देशालाही कोरोनाने हैराण केले आहे.या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्याचे मुख्यमंञी उध्दव ठाकरे तसेच आरोग्य मंञी राजेश टोपे यांची तत्परता व निर्णय पद्धती संपुर्ण महाराष्ट्र पहातच आहे.त्यांच्या कार्याचे नागरिकातून कौतुक ही होत आहे.  

मुख्यमंञी ऊद्धव ठाकरे यांनी योग्य वेळी योग्य  निर्णय घेतलेले आहेत.आरोग्य मंञी यांनी तर स्वत:ची आई आजारी असतानासुद्धा महाराष्ट्राच्या जनतेची काळजी घेत आरोग्यमंञीपदाची धुराही अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळताना पाहावयास मिळत आहे.

 पोलीस प्रशासनही कामगिरी उत्तम प्रकारे पार पाडत आहेत.पोलीस प्रशासनाचा कुठे कुठे अतिरेक झाला परंतु तो अतिरेक आपल्या जनसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठीच आहे. काही ठिकाणी पोलीस प्रशासनाला कुठे लाठी उचलावी लागली परंतु अनेक ठिकाणी त्यांचेकडून माणुसकीचेही दर्शन पहावयास मिळत आहे.

   देशात संचारबंदी जाहीर करुनही संचारबंदीचे उलंघन नागरिक करत असल्यामुळेच पोलीसांना काठीचा वापर करावा लागत आहे.जगातील इतर देशांपेक्षा आपला भारत या कोरोना व्हायरसला चांगला प्रतिकार करत आहे.म्हणुन सर्वांनी गाफिल न राहता प्रशासनाने वारंवार दिलेल्या सुचनांचे पालन करण्याची गरज आहे. शासन कठोर पाऊल उचलत आहे ते फक्त आपल्या आरोग्यासाठीच आहे हे सर्वानी समजुन घेण्याची गरज आहे.
 
प्रत्येक गावात व शहरात हातावर पोट असणारांची संख्या जास्त आहे.या लाॅकडाऊनमुळे अशा लोकांचे तसेच लहान मोठ्या अन्य व्यवसायिकांचे व्यवहार ठप्प झालेले आहेत.या परिस्थितीतही सरकारकडून प्रत्येक रेशनवर एकदाच तीन महीन्यांचा माल उपलब्ध केलेला आहे. अत्यावश्यक सेवांनाही या संचारबंदीतून सुट दिलेली आहे.

सोशल मिडीवर काहीजण दारुची दुकाने काही काळासाठी तरी चालू करण्याची मागणी करत आहेत.दुसर्या बाजुला दररोज दारु पिऊन घरी जाणार्याच्या घरीतील वैतागलेल्या महिलांनी ही दारुची दुकाने व ही दारुच कायमची बंद करण्याची मागणी केली आहे.एवढी संचारबंदी असतानाही दारु पिणारे माञ आजही काहीही करुन संध्याकाळी पिऊन येतच आहेत.भांडण ,मारहाण करतच आहेत. म्हणून संपुर्ण देशातुन कायमची दारु बंद करण्याची मागणी महिला वर्गातून होत आहे.

या कोरोना व्हायरसने संपुर्ण जगात धुमाकुळ घातला आहे .संपुर्ण जग हतबल झाले आहे .अशा परिस्थीतीतही महाराष्ट्राचे मुख्यमंञी उद्धव ठाकरे व आरोग्य मंञी राजेश टोपे हे योग्य निर्णय घेत असल्याची तसेच देश पातळीवर देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी ही योग्य निर्णय घेत असल्याची भावना नागरिक बोलून दाखवत आहेत.
 
Top