नातेपुते (श्रीकांत बाविस्कर ) -कोरोना रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून संपूर्ण देशात लोकडावन ची अंमलबजावणी होत आहे अशातच माळशिरस तालुक्याचे तहसीलदार अभिजीत पाटील यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या सूचनेनुसार कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता संचारबंदी अंतर्गत अन्य जिल्ह्यातून तालुक्यांमध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी ग्राम रक्षा पथक कार्यान्वित केले आहे.हे ग्रामरक्षा पथक रात्रंदिवस जिल्ह्याच्या सीमेवरती चार व्यक्तीची एक टीम अशा तीन टिम आठ तासाच्या पाळीने गावच्या तसेच जिल्ह्याच्या सीमेचे रक्षण करत आहेत. ते आपला जीव धोक्यात घालून आपल्या गावातील नागरिकांच्या रक्षणाची जबाबदारी घेत अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून किंवा ते करीत असलेल्या कार्यास थोडासा हातभार म्हणून अँड. प्रशांत रुपनवर यांनी राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकशिव येथील ग्राम रक्षकांना मोफत सॅनिटीझर वाटप करून त्यांनी इतरांच्या सुरक्षेबरोबर स्वतः ही सुरक्षिततेची काळजी घ्यावी.ग्राम रक्षकांचे कुटुंबही सुरक्षित राहावे, यासाठी मोफत हँड सँनीटायझर वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रसेवा प्रतिष्ठानचे सचिव सचिन शेंडगे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाळासाहेब रुपनवर, एकशिव गावचे सरपंच शांतिनिकेतन साळवे, ग्रामरक्षा कमिटीचे सदस्य उदय गावडे,अमोल खताळ,अविनाश धायगुडे,निखिल जानकर, दीपक धायगुडे, मार्गदर्शक रज्जाक आतार सर उपस्थित होते.
 
Top