पंढरपूर - कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे उद्भवलेल्या परीस्थिती मुळे सोलापूर जिल्हातील अनेकांचे हातावरचे पोट असलेल्या लोकांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे. शासनाचेवतीने स्वस्त धान्य दुकानात जीवनावश्यक वस्तू देणार आहेत.पण ज्यांची रेशनकार्ड आहे त्यांनाच तीन महिन्याचे रेशन दिले जाणार आहे,पण रेशनकार्ड हरवले आहे,कोणी नवीन रेशनकार्ड काढले नाही त्यासाठी जिल्हा तहसिल पुरवठा विभागाने आधार कार्ड झेरॉक्स घेवून त्या गोरगरीब जनतेला रेशन धान्य वाटप करावे.त्यासाठी केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने जिल्ह्यातील पुरवठा विभागाला एक नवीन आदेश काढून आधार कार्ड नोंदणी करून गोरगरीब जनतेला रेशनकार्ड असो किंवा नसो या सर्वांना रेशन धान्य देण्यात यावे.यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी लक्ष घालून सामान्य कष्टकरी, शेतमजुर, बेरोजगारांना,सफाई कामगार यांना रेशन धान्य वाटप करण्यात यावे, अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महिला आघाडीच्या मोहोळ तालुकाध्यक्षा मंगलाताई गवळी यांच्यावतीने करण्यात आली आहे .
 
Top