नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून लावण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनला १७ दिवस झाले . या लॉकडाऊनचा परिणाम सध्या करोना बाधितांच्या संख्येवरही दिसून येतोय. वैद्यकीय क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था 'इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्च' (ICMR)नं एका अहवालात केंद्राच्या लॉकडाऊनच्या निर्णयाचं कौतुक करताना 'देशात लॉकडाऊन लागू करण्यात आलं नसतं तर इथे इटलीपेक्षाही भयानक अवस्था दिसली असती असा दावा केलाय. लॉकडाऊनअभावी आज करोना बाधितांची संख्या १५ एप्रिलपर्यंत ८ लाख २० हजारांहून अधिक लोक करोना संक्रमित असते, असंही आयसीएमआरनं म्हटलंय.


आयसीएमआरचा अनुमान R0-2.5 च्या सिद्धांता नुसार भारतात प्रत्येक संक्रमित व्यक्तीनं एका महिन्यात ४०६ लोकांमध्ये या विषाणूचं संक्रमण फैलावलं असतं, मात्र लॉकडाऊननंतर एक संक्रमित व्यक्तीचं संक्रमण केवळ २.५ लोकांपर्यंत पोहचू शकलं आहे. या अहवालानुसार,भारतात लॉकडाऊननंतर संक्रमणाचा वेग खूपच मंदावलाय.
 
Top