नातेपुते (श्रीकांत बाविस्कर) :कोरोना विषाणूने जगात हादरले असून कोरोना रोगाला रोखण्या साठी भारत देशात लॉक डाऊन असल्याने धर्मपुरी ग्रामपंचायतने धर्मपुरी गावातील व वाडी वस्ती वरील नागरिकांना रात्री-अपरात्री दवाखान्यात जाण्यास अडचण होऊ नये म्हणून ग्रामपंचायत मार्फत गाडीची सोय केलेली असून गाडीवरती 9730924269 हा मोबाईल नंबर टाकला असून अडचण आल्यास या नंबरवर फोन केल्यास गाडी आपल्या दारी येईल असे आव्हान ग्रामस्थांना ग्रामपंचायतमार्फत करण्यात आले आहे.

    धर्मपुरीचे सरपंच बाजीराव काटकर व सर्व सदस्य ,ग्रामसेवक, तलाठी,ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी खबरदारी म्हणून गावात व वाडी-वस्तीवर लक्ष ठेवले असून आता पर्यंत चार वेळा जंतुनाशक फवारणी केली आहे. लोकांच्या जनजागृतीसाठी ध्वनिफीतद्वारे क्लिप वायरल केली आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक,सेविका यांना मास्क, सँनीटायझर साबण असे सामान धर्मपुरीचे सरपंच बाजीराव काटकर यांच्या हस्ते देण्यात आले.
 
Top