पंढरपूर -संपूर्ण जगात कोरोना विषाणूच्या प्रसारा मुळे अतिशय बिकट परिस्थितीतून आपण जात आहोत. अशा अवघड परिस्थितीमध्ये सध्या अंगणवाडी सेविका आणि आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या सेविकांना तातडीने मदत जाहीर करावी.लाॅकडाऊन व संचारबंदी लागू केल्यापासून अंगणवाडी सेविका आणि आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या सेविका घरोघरी जावून जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडे विविध माहिती पाठवतात.अंगणवाडी सेविका यांची तर अवस्था बिकट निर्माण झाली आहे. लाॅकडाऊन चालू झाल्यापासून महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी शाळा बंद असल्यापासून त्या दोन्ही सेविकांची पगारी अजून त्यांच्या खात्यावर जमा झाल्या नसल्याने त्यांच्या कुटूंबिवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेने व  महाविकास आघाडी सरकारने अंगणवाडी सेविका आणि आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या सेविकेच्या पगारी लवकर करून त्यांना त्यांच्या प्रपंच व कुटूंबियांना किराणा साहित्य गहू तांदूळ साखर आवश्यक वस्तू सरकारने त्यांना घरपोच देवून आधार देण्याचे काम करावे,अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठानचे उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष ॠषिकेश घाटे यांनी निवेदनाव्दारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार,आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
 
Top