सोलापूर :-सोलापूर जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूच्या संदर्भात टोल फ्री क्रमांक सुरु केला आहे. १८००२३३५०४४ असा हा क्रमांक असून २४ तास सुरु राहील. या क्रमांकावर कोरोना विषाणू संदर्भात माहिती,तक्रार अथवा इतर अनुषंगिक माहिती मिळू शकेल,असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी सांगितले.


राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे लॉकडाउन कालावधीत अवैध मद्य विक्री रोखण्याकरीता १८००८३३३३३३ हा‍ टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला आहे.

त्याचबरोबर ८४२२००११३३ हा व्हॉटस्ॲप क्रमांक सुरु करण्यात आला आहे.अवैध मद्य निर्मिती,वाहतूक याबाबत नागरिक या क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतात,असे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी कळविले आहे.

नागरिक अवैध दारू मद्यविक्रीच्या बाबतीत तक्रार करण्यास घाबरत आहेत. तक्रारदार त्यांची नावे गोपनीय राहणार असल्याची खात्री द्यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.अनेक मद्यपी मद्यपान करून रस्त्यावर मोकाट फिरत असताना दिसत आहेत.
 
Top