नाशिक -नाशिक येथील अंबड पोलीस स्टेशन MIDC पोलीस चौकी या ठिकाणी अंबड पोलीस स्टेशनकडून अंबड गाव ,शांतीनगर झोपडपट्टी, गरवारे झोपडपट्टीतील ४५० गरजू लोकांना किराणा वाटप करण्यात आलेला आहे तसेच पोलीस स्टेशनकडून आतापर्यंत एकूण ७०० कुटुंबांना किराणा वाटप करण्यात आलेले आहे


पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे पंचवटी पोलीस स्टेशन कडून, पंचवटी पोलिस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी यांनी दिनांक २३/०४/२०२० रोजी पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीतील फुलेनगर येथील मनपाचा मायको दवाखाना,पंचवटी कारंजा येथील इंदिरा गांधी हॉस्पिटल, खाजगी सद्गुरु हॉस्पिटल काट्या मारुती चौक, सुयोग हॉस्पिटल भाजी मार्केट पंचवटी ,साई क्लीनिक काळाराम मंदिर समोर इत्यादी ठिकाणी जाऊन


तेथील डॉक्टर, नर्सेस, सुरक्षा कर्मचारी, सफाई कर्मचारी इत्यादींचा गुलाब पुष्प देऊन, त्यांनी करोना covid-19 मध्ये जे काम केले आहे व करीत आहेत त्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून, त्यांचे मनोबल वाढवले पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करून त्यांचे प्रति आभार व्यक्त केले .
 
Top