नातेपुते,(श्रीकांत बाविस्कर)-सध्या कोरोना या रोगाने संपूर्ण जग संकटात असताना अकलूज परिसरात हातावर पोट असलेली घर संचारबंदी मुळे काही कामधंदा करू शकत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.


   हे पाहून अविनाश सोनवणे मित्रमंडळाच्यावतीने अकलुज शहर युवासेना प्रमुख शेखर खिलारे यांच्या उपस्थितीत अकलूज येथील राऊतनगर , आंबेडकरनगर व परिसरात जीवनावश्यक अन्न धान्य तांदूळू -२,गहु-२ ,साखर-१किलो,शेंगदाणे-१ किलो, तेल-१किलो,तूरदाळ-१किलो,चहापत्ती-पावशेर, घरगुती सामानाचे किट अशा अनेक वस्तूंचे वाटप केले.असून सदरच वाटप युवासेना शहर प्रमुख शेखर खिलारे,संदीप इंगवले,कानिफ कदम,आकाश भोसले, ज्ञानेश्वर भोसले,आकाश रोडगे, अक्षय वाईकर,अक्षय भोसले, औदुंबर बागल,अविनाश जगदाळे,सनी अंबुरे,महेश बबलादी,प्रकाश बनकर आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी घरोघरी जाऊन गरजवंतांना पोहचवण्यासाठी परिश्रम घेतले.
 
Top