पंढरपूर - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्या साठी सर्वत्र लॉकडाऊन सुरू असूनही बरेचजण मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने घराबाहेर पडत आहेत . पंढरपूर तालुक्यातील टाकळी रोड परिसरात अशाच १२ जणांवर व विनाकारण फिरणा-या ७ जणांवर पंढरपूर तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.


पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत टाकळी रोड वर मॉर्निंग वॉक करणारे १२ जणांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८, ६९ प्रमाणे कारवाई करण्यात आली. तसेच इतर ७ जणांसह अशा एकूण १९ जणांवर कारवाई केली आहे. एकुण १७ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.
 
Top